छावा संघटनेचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचा इशारा!
नेवासा – नेवासा येथील सब रजिस्टार यांनी तुकडा बंदी कायदा लागू असतानाही आणि अनधिकृतपणे गेल्या पंधरा दिवसात तीन ते चार खरेदीखत दस्त केले असून कायद्याचे व नियमाचे उल्लंघन केले आहे.याप्रकरणी नेवासा येथील रजिस्टार यांना तात्काळ निलंबित करावे असं निवेदन जिल्हाधिकारी अहिल्यानगर, मुद्रांक जिल्हा अधिकारी तथा सहज जिल्हा निबंधक वर्ग 1, व प्रांत अधिकारी नेवासा विभाग यांना छावा संघटनेचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण व कार्यकर्त्यांकडून देण्यात आले. त्यांच्याविरुद्ध कारवाई न झाल्यास छावा संघटनेच्या वतीने मोठे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी याबाबत तात्काळ संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.



कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.