नेवासा : देहू आळंदीच्या धर्तीवर ज्ञानेश्वर माऊलीच्या कर्मभूमीतून निघालेला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पालखी पायी दिंडी सोहळा भविष्यात आळंदीप्रमाणेच विशाल सोहळा होईल असा आशीर्वाद वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील शांतीब्रम्ह मारुती महाराज कु-हेकर यांनी देऊन या सोहळ्याच्या समस्त आयोजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली
श्रीक्षेत्र नेवासा येथून निघालेला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी पायी दिंडी पालखी सोहळा मंगळवारी दि.१) दुपारी टेंभुर्णी ता. माढा जिल्हा सोलापूर येथे विश्रांती साठी होता त्यावेळी शांतिब्रम्ह मारुती महाराज कु-हेकर यांनी या दिंडी सोहळ्यात भेट दिली माउलीच्या पालखीचे दर्शन घेतले. यामुळे उपस्थित समस्त वारकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे भरते पहावयास मिळाले

श्री ज्ञानेश्वर देवस्थान श्रीक्षेत्र नेवासा यांच्या वतीने वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी त्यांचे स्वागत केले
जोग महाराजांनी सुरू केलेली वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्याचे काम मारुती महाराज कु-हेकर हे करीत असल्याने वारकरी त्यांना प्रति जोग महाराज समजतात
आजही वारकरी शिक्षण संस्थेतून सुसंस्कारित वारकरी घडवण्याचे काम मारुती महाराज करीत आहेत
श्रीज्ञानेश्वर माऊलीच्या कर्मभूमीतून आळंदीच्या धर्तीवर निघालेला हा पालखी सोहळा भविष्यात आळंदीप्रमाणेच विशाल होईल असा आशीर्वाद कु-हेकर महाराजांनी यावेळी दिला


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.