ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
कृषी

सौंदाळा : मूळा एज्युकेशन सोसायटीच्या कृषी महाविद्यालय, सोनई येथील कृषिदूतांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत सौंदाळा गावात “कृषी दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने कृषिदूतांनी शेतकऱ्यांना फळबाग विकास, जलसंधारण, सेंद्रिय शेती, आधुनिक तंत्रज्ञान, पीकविमा, शेततळे अनुदान, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, फळबाग लागवड अनुदान योजना आदी विविध सरकारी योजनांची माहिती दिली. कृषी क्षेत्रातील नव्या संधी व योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

कृषी

त्यानंतर झेड.पी. प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संरक्षणाचे व शाश्वत शेतीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

कृषी दिनानिमित्त झालेल्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये पर्यावरण जागृती आणि नव्या कृषी योजनांचा लाभ घेण्याबाबत सकारात्मक संदेश पोहोचला.

या उपक्रमासाठी कृषिदूत भावेश बागुल, रितेश मराठे, स्नेहांशू मोहिते, प्रशांत लगड, अभिजित कदम आणि साहिल कुंभारे यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनील बोरुडे, समन्वयक डॉ. अतुल दरंदले आणि कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकृष्ण हुरुळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

कृषी
कृषी

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कृषी
कृषी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कृषी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *