नेवासा | सचिन कुरुंद – आज जि.प.प्राथमिक शाळा-प्रवरासंगम शाळेत आषाढी एकादशीनिमित्त बालवारकरीचा दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा-प्रवरासंगम शाळेत बालदिंडी चे आयोजन करण्यात आले होते.सर्व मुले वारकरी वेशभूषेत आले होते.झेंडे व टाळ ,कपाळावर अष्टीगंधाचा टिळा लावून वेशभूषेने वारकरी बनले होते.सर्व मुली सुंदर आवरून नटूनथटून तुळस ,टाळ,ग्रंथ घेऊन चालत होत्या .लयबद्ध टाळ वाजवत ज्ञानोबा तुकाराम चा जयघोष करत दिंडी ग्रामपंचायत प्रवरासंगम येथे पोहचली.इयत्ता तिसरी व चौथीच्या मुलींनी माऊली माऊली या गीतावर टाळासह सुंदर नृत्य सादर केले.तन्वी रासने या विद्यार्थिनी ने अतिशय सुंदर ,रेखीव पालखी बनवली होती .पालखीत विठ्ठल व रखुमाईची मूर्ती विराजमान झाली होती

पालखीचे स्वागत करण्यासाठी प्रवरासंगम च्या सरपंच सौ.अर्चनाताई सुडके व ग्रामस्थ ,मातापालक,पालक उपस्थित होते. दिंडीचे मुख्य आकर्षन म्हणजे विठ्ठल व रखुमाईच्या वेशभूषेत साई पवार ,ज्ञानेश्वर सोनवणे,नितेश काळे,शिवम रेलकर ,ईश्वरी कदम,आराध्या कासोदे,ईशान्या डावखर होते. तसेच संत ज्ञानेश्वर,निवृत्ती,सोपान व मुक्ताई वेशभूषेत मुले होते. सर्व ग्रामस्थ कुतूहलाने चिमुकल्या कडे मंत्रमुग्ध होऊन बघत होते. ठिकठिकाणी विठ्ठल रखुमाईचे पूजन करण्यात आले.माऊली नृत्याने सर्वाचे लक्ष वेधून कौतुकाची थाप मिळवली .नृत्याविष्कार उत्कृष्ट सादर केल्याबद्दल भरपूर बक्षीस ही मिळाली . बालदिंडी चा समारोप प्रवरासंगम च्या प्रांगणात विद्यार्थ्यांना खाऊ वाटून करण्यात आला.

माता पालक सदस्या सौ. प्रियंकाताई पाटील यांनी विद्यार्थ्यांना चाॅकलेट वाटून मुलांचा आनंद द्विगुणित केला.हा बालदिंडी उपक्रम प्रवरासंगम शाळेचे मुख्याध्यापक सुनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला .हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संजय लाड,राजेंद्र चापे,दयानंद गाडेकर,शरदभणगे,जयश्री कोल्हे ,सुनिता कर्जुले-राऊत,नूतन जोशी,छाया वाघमोडे,कल्पना धनावत,वृषाली घालमे,वर्षा भांबिरे यांचे उत्तम सहकार्य लाभले.या उपक्रमाचे सर्व प्रवरासंगम परिसरातून कौतुक होत आहे.प्रवरासंगम गावच्या सरपंच सौ.अर्चनाताई सुडके यांनी शिक्षकवृंदाचे भरभरून कौतुक केले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.