नेवासा – दिनांक. ०३/०७/२०२५ रोजी रात्रौ २०/०० वा चे सुमारास नेवासा पोलीस स्टेशन हददीत मौजे नेवासा खुर्द.ता. नेवासा. जि. अहिल्यानगर येथील भराव परिसरामध्ये काटवणात १) शाहिद जाफर चौधरी २) युनुस बिबन खाटीक ३) रियाज कादर चौधरी ४) तैय्युब गुलाब चौधरी.रा. नेवासा खुर्द.ता. नेवासा.जि. अहिल्यानगर यांनी १८ गोवंशीय जनावरे विना चारापाण्याचे दाव्याने कत्तलीसाठी बांधुन ठेवले आहे अशी गोपणीय माहिती पोलीस निरीक्षक धनजंय अ जाधव यांना गुप्तबातमीदार मार्फत मिळाली असता लागलीच प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ पोलीस स्टाफ व पंच यांना थोडक्यात बातमीचा आशय सांगुन छापा कारवाई करणेबाबत मुफजल आदेश दिल्याने पोलीस स्टाफ व पंच यांनी सदर ठिकाणी जावुन छापा कारवाई केली असता भराव परिसर काटवणामध्ये एकुण १८ गोवंशीय जनावरे वेगवेगळया ठिकाणी विना चारापाणी चे कत्तलीच्या उददेशाने बांधुन ठेवलेले दिसले.

सदर ठिकाणी मिळुन आलेल्या एकुण १८ गोवंशीय जनावरे किंमत ४३,०००/- यांची पंचासमक्ष पंचनामा करुन चारा पाण्याची सोय करुन सदर गोवंशीय जनावरे सुखरुप गोशाळा मध्ये जमा केले असुन १) शाहिद जाफर चौधरी २) युनुस बिबन खाटीक ३) रियाज कादर चौधरी ४) तैय्युब गुलाब चौधरी.रा. नेवासा खुर्द.ता. नेवासा.जि. अहिल्यानगर यांचे विरुध्द पोकॉ अवि वैदय यांचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि नं ६३८/२०२५ महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयांचा पुढील अधिक तपास पोहेकॉ अनिल बडे हे करित आहेत.

सदरची कामगिरी श्री. सोमनाथ घार्गे सो, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. वैभव कुलबुर्गे सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर विभाग, श्री. सुनिल पाटील सो, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे नेवासा प्रभारी अधिकारी श्री. धनजंय अ जाधव पोलीस निरीक्षक, पोसई विकास पाटील, पो. हवा. अनिल बडे, पोकॉ अवि वैदय, पोकॉ भारत बोडखे, पोकॉ नारायण डमाळे, पोकॉ अमोल कर्डिले, पोकॉ गणेश जाधव यांचे पथकाने केली आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.