ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
शेत

नेवासा | श्री नाथाभाऊ शिंदे पाटील – अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शेत व शिवरस्ता समस्याग्रस्तांचा लवकरच जिल्हा न्यायाधीश व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत संयुक्त बैठक होणार महाराष्ट्र राज्य शेत व शिवपालन रस्ता चळवळीचे प्रणेते व अध्यक्ष श्री शरदराव पवळे व राज्य समन्वयक श्री दादासाहेब जंगले पाटील यांचे मार्गदर्शनाने व शेत रस्ता पीडीतांच्या मागणीचा विचार करता सध्या शेत व शिव पानंद रस्त्यांची शासकीय प्रकरणे निकालात लवकरात लवकर निघत नाही म्हणून त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा अहिल्यानगर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी व सर्व 14 तालुक्यातील म्हणजे नेवासा श्रीरामपूर शेवगाव पाथर्डी जामखेड कर्जत अकोले कोपरगाव राहता राहुरी अहमदनगर श्रीगोंदा, पारनेर व संगमनेर येथील तहसीलदार,प्रांताधिकारी अधिकारी आणि अहिल्यानगरचे जिल्हा मुख्यन्यायाधीश श्रीमती अंजू एस शेंडे मॅडम यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली शेत रस्ता समस्या सोडविण्यासाठी समन्वयाची भूमिका पार पाडण्यासाठी व शेत रस्त्यांचे प्रश्न निवारणासाठी व निफटार्‍यासाठी एक संयुक्त बैठक व मेळावा आयोजित करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीचे राज्य उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी नुकतीच जिल्हाधिकारी माननीय श्री पंकज आशिया साहेब यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक 4 जुलै 2025 रोजी बैठकीची तारीख निश्चित करण्यासाठी पुन्हा माननीय जिल्हाधिकारी पंकज आशिया साहेब यांना व निवासी जिल्हाधिकारी श्री दादासाहेब गीते साहेब यांना चळवळीच्या सर्व कार्यकर्ते व शेत रस्ता समस्या पीडितांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. त्यावेळी माननीय जिल्हाधिकारी पंकजा साहेब यांनी पुढील आठवड्यात आपण अशा प्रकारची बैठक घेणारच आहोत असे सांगितले`

शेत

यावेळी चळवळीचे अध्यक्ष श्री शरद राव पवळे यांचा दूरध्वनी वरून जिल्हा मुख्य न्यायाधीशांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या शेत रस्ता प्रश्न सोडविण्यासाठी मेळावा आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आले

त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या शेत रस्ते प्रश्न मार्गी लागण्यासाठी असा मेळावा लवकरच घेऊ अशी सकारात्मक भूमिका माननीय जिल्हाधिकारी यांनी घेतली आहे
शेतकऱ्यांचे वैयक्तिक रस्त्याचे प्रकरणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम 143 अन्वये व मामलेदार ॲक्ट 1906 चे कलम 5 /2अन्वये करावे लागतात परंतु त्यामध्ये न्याय प्रणाली सकारात्मक नसल्यामुळे अधिकाऱ्यांकडून निकाल व्यवस्थित दिला जात नाही म्हणून शेतकरी अत्यंत त्रस्त झालेले आहेत तसेच काही शिव रस्त्यांचीही प्रश्न मार्गी लागत नाही यावर उपाय म्हणून जिल्हा मुख्य न्यायाधीशांचे मार्गदर्शन ही आवश्यक आहे त्याकरता असा मेळावा घेतला जाणार आहे यावेळी श्री बाळासाहेब थोरात माका, श्री मतीन खान पठाण नेवासा, श्री राजू भाऊ गरड कुकाना, मिनीनाथ घाडगे नजीक चिंचोली, भाऊसाहेब नरोटे बाबासाहेब मकासरे, अविनाश माकोणे, रामभाऊ पवार अमळनेर, हरिभाऊ तुवर मनोहर मतकर वसंत भोगे संभाजी बाबुराव कुऱ्हे,आसाराम राशिनकर, राजेंद्र कुऱ्हे,रंगनाथ पंडित गणेश कातोरे शरद भोगे बाळासाहेब जाधव विनायक मकासरे प्रशांत चौधरी सोमनाथ कोरडकर, महेश लक्ष्मण पवार आदिनाथ पवार अशोक धात्रक अशोक सोनवणे खरवंडी अविनाश मेहर नगर इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष श्री नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी दिली आहे हा मेळावा सर्व शेत रस्ता समस्याग्रस्त शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे

शेत

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

शेत
शेत

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

शेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *