श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषि विज्ञान केंद्र दहिगाव ने व कृषक भारती को ऑपरेटीव्ह लिमिटेड अहिल्यानगर यांचे संयुक्त विद्यमाने सहकार सप्ताह अंतर्गत सहकार सक्षमीकरण मोहीम या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दिनांक ३ जुलै २०२५ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष मा.आ.श्री. चंद्रशेखर घुले पाटील यांनी शेतकऱ्यांसमोर सर्वसमावेशक आणि शाश्वत उपायांना चालना देण्यासाठी सहकारातून समृध्द्धीकडे वाटचाल करण्यासाठी सहकाराला पाठबळ देणे गरजेचे असल्याचे, सहकारी संस्थांनी आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना मिळते असे मत व्यक्त केले. कृषि विज्ञान केंद्रांचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. श्याम सुंदर कौशिक यांनी सद्य परिस्थितीत तूर, उडीद, सोयाबीन, कापूस तसेच ऊस पिकामध्ये करावयाच्या उपाययोजना, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती इ. बाबीवर सखोल मार्गदर्शन केले. कृभको संस्थेचे विभागीय व्यवस्थापक पुणे श्री. शंकरराव शेंडगे यांनी सहकारी संस्थासाठी शासनाच्या नवीन योजनांबद्दल माहिती दिली.

उद्यानविद्या विभागाचे विषय विशेषज्ञ श्री. नंदकिशोर दहातोंडे यांनी केळी व लिंबू पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन याबद्दल शेतक-यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी श्री. मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. काकासाहेब नरवडे, पंडितराव भोसले, नानासाहेब मडके, बाळासाहेब पडघणे, दहिगाव ने चे उपसरपंच श्री राजाभाऊ पाऊलबुद्धे, शब्बीर शेख, रांजणी चे सरपंच श्री काकासाहेब घुले, कृभको संस्थेचे विभागीय व्यवस्थापक श्री. योगेश बिडवे, औद्योगिक कृषि महामंडळ व्यवस्थापक श्री. राहुल पवळे, कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ माणिक लाखे, नारायण निबे, डॉ. चंद्रशेखर गवळी, प्रकाश हिंगे, प्रकाश बहिरट, अनिल देशमुख, डॉ. प्रविण देशमुख, दत्तात्रय वंजारी, अनिल धनवटे यांचेसह नेवासा, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातून १०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये शेतक-यांना फळ रोपांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजिनियर राहुल पाटील यांनी केले तर कृभको संस्थेचे जिल्हा प्रतिनिधी श्री. सुदर्शन पाटील यांनी आभार मानले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.