नेवासा:- सविस्तर वृत्त असे की, गुरुवार दिनांक 3 जुलै रोजी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा 112 क्रमांकाला कॉल आला की, कॉलरला विरान्स वाईन्स नेवासा फाटा समोर दोन ते तीन जण मारहाण करीत आहेत. अशा माहितीवरून आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा डायल_112 नेमणुकीस असलेले अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल नारायण डमाळे व पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील, पोलीस हवालदार किरण गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल गणेश जाधव विरांस वाईन्स समोर गेले असता सदर ठिकाणी तीन जण मद्यधुंद अवस्थेत एकमेकाला दगडाने मारहाण करीत होते.

सदरची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांना दिली असता त्यांनी शासकीय मोबाईल क्रमांक दोन घटनास्थळी तातडीने पाठवली असता 1.प्रविण काशिनाथ शेळके 2.अंकुश अशोक डौले, व 3.अक्षय अशोक दळवी सर्व रा. नेवासा बुद्रुक या तीन जणांना ताब्यात घेण्यात आले. तिघांची ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे वैद्यकीय तपासणी केली असता मद्यार्काच्या अमलाखाली आढळून आले. मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणे या अपराधाखाली मुंबई दारूबंदी कायद्यान्वये पोलीस ठाणे नेवासा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यास 6 महिने शिक्षा किंवा 10000 रुपये एवढा दंड आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक, संजय माने, पोलीस ठाणे नेवासा हे करीत आहेत. अशी कारवाई या पुढे ही चालु राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक धनंजय अ. जाधव यांनी सांगितले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.