नेवासा – पोलीस स्टेशन अंतर्गत माळिचिंचोरा बीट हद्दिमधील दि.०३/०७/२०२५ रोजी पहाटे ०४/०० वा. चे सुमारास माळिचिंचोरा ता. नेवासा गावाचे शिवारातील संभाजीनगरहुन अहिल्यानगर जाणारे हायवे रोडवर हाँटेल शितल जवळ एक बेवारस अनोळखी महिला वय अंदाजे ६० वर्षे हि रस्त्यावर रस्ता अपघातात जखमी होवुन मयत अवस्थेत दिसुन आलेने तिला ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे दाखल केले असता ०६/०० वा. वैद्यकीय अधिकारी यांनी ती मयत असल्याचे सांगीतले वगैरे म।। चे एम.एल.सी. वरुन नेवासा पोलीस स्टेशन अकस्मात रजी. नं. ८६/२०२५ भारतीय नागरीक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे दि.०३/०७/२०२५ रोजी १७/३० वा. दाखल आहे.

मयताचे वर्णन – एक अनोळखी बेवारस महिला वय अंदाजे ६० वर्षे, रंग गोरा, नाकात नथ, गळ्यात पिवळ्या धातुची पोत, डोक्याचे केस लांब काळे पांढरे, कानात फुल, अंगात आकाशी रंगाचा ब्लाऊज, निळे रंगाची सहावार साडी त्यावर पिवळे, लाल, हिरवे रंगाची लाईन, लाल रंगाचा परकर, हातात पांढरे धातुच्या बांगड्या, पायात पैंजन असे वर्णन आहे.
सदर मयताचे वर्णन व फोटोग्राफ वरुन ओळख समजुन येत असल्यास खालील फोन नं. वर संपर्क करावा –
1) मा. पोलिस निरीक्षक धनंजय ए.एस. जाधव सो., (मोबा नं. 9923581111,9011581111)
२) पो.हे.काँ.१९९ एस. एन. माने (मो.नं. ८४१९९७६९११)
४) नेवासा पोलीस स्टेशन दुरध्वनी क्रं. (०२४२७-२४१२३३)


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.