नेवासा –नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्थेत, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव बेल्हेकर यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने रक्तदान शिबीर व वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला.
यावेळी शिनाई देवस्थानचे महंत अविराज महाराज, भानसहिवरे गावचे सरपंच, उपसरपंच दत्तात्रय काळे, धनेश मुनोत, सोसायटीचे चेअरमन बाबासाहेब ढवाण, ज्ञानेश्वर पवार अमोल गुजर, स्वप्नील जाधव, अभिषेक पठारे, पोपटराव शेकडे, संस्थेच्या संचालिका डॉ. रंजनाताई बेल्हेकर, संचालक अभिषेक बेल्हेकर, कॅम्पस डायरेक्टर डॉ. अरूण इंगळे, डेप्युटी डायरेक्टर व पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य हेमंत आहिरे, पी.व्ही. बेल्हेकर, आयुर्वेद कॉलेजचे प्राचार्य डॉ. नारायण भालसिंग, संस्थेचे कॉर्डिनेटर व बीसीए कॉलेजचे प्राचार्य रोहन कांडेकर, कृषि महाविद्यलायचे प्रा. मनोज माने, संस्थेचे ऑफिस
सुप्रीटेंडंट शिवनारायण वाघे, ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुबोध हिवराळे, ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचे प्राचार्य काकासाहेब वाल्हेकर, प्राचार्या स्वाती वाघे, एमबीए कॉलेजचे प्रा. अजित तांबे तसेच उपप्राचार्य अमोल विघे उपस्थित होते.

अविराज महाराज, दत्तात्रय काळे, धनेश मुनोत, श्री. भणगे, बाबासाहेब ढवाण, ज्ञानेश्वर पवार, अमोल गुजर, स्वप्नील जाधव, अभिषेक पठारे, पोपटराव शेकडे, डॉ. अरूण इंगळे यांनी वृक्षारोपण केले.
संस्था व लायन्स ब्लड सेंटर संभाजीनगर यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यात लायन्स ब्लड सेंटरचे जनसंपर्क अधिकारी शामराव सोनवणे यांनी रक्तदाना चे महत्व पटविले.
भानसहिवरे गावचे उपस्थित मान्यवर व सस्थेतील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी संस्थेचे आधारवड संस्थापक व अध्यक्ष डॉ. सुरेशराव बेल्हेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.