नेवासा : विलक्षण ओढीने सर्व भक्त पांडुरंगाच्या भेटीसाठी वारी करून दरवर्षी जात असतात त्याच प्रमाणे आषाढी एकादशी निमित्ताने दिनांक ०५जुलै रोजी नेवासा तालुक्यातील हंडी निमगाव येथील रोझलँड इंटरनॅशनल स्कूल तर्फे भव्य आणि उत्साहपूर्ण बाल दिंडी ही विठ्ठलाच्या भेटीसाठी सकाळी १० वाजता निघाली. या बालदिंडीत विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषभूषा करून सहभागी होत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले.
कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, ढोल-ताशा, आणि लेझीम यांच्या सादरीकरणातून रसिकांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेत दिंडी सोहळ्याला एक नवीन उंची दिली.वारी हा केवळ सोहळा नाही तर आपल्या संस्कृतीशी, परंपरेशी आणि विद्यार्थ्याच्या मनाशी जोडणारा सेतू आहे.यातून संस्कार ,भक्ती आणि शिस्त याचे बाळकडू मुलांना देण्याचा प्रयत्न शाळा करत आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सुनीताताई भाऊसाहेब अंबाडे,निकिताताई दीपक अंबाडे, अजित अंबाडे, प्राचार्य मॅथ्यू सर, सौ. मनीषा सिन्नरकर, कुटे सर तसेच शिक्षक आणि पालक वर्गांची प्रमुख उपस्थिती होती.
ही बालदिंडी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठल भक्तांचे लक्ष वेधणारी ठरली.दिंडी मार्गावर पालक, नागरिक आणि शिक्षक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या सुंदर सोहळ्याचे यशस्वी आयोजन शाळेचे संचालक श्री. भाऊसाहेब आंबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सजावट, पोशाख, मेकअप व सांस्कृतिक सादरीकरण यासाठी मेहनत घेतली आणि कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी कर्मचाऱ्यांनीही सहकार्य केले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.