ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पंढरपूर

नेवासा : आषाढी वारी सोहळयाचे औचित्य साधून नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड संस्थानच्या पंढरपूर येथील मठामध्ये श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा पालखी निमित्ताने राष्ट्र संत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायणची सांगता गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या काल्याच्या किर्तनाने सोमवारी दि.७ जुलै रोजी भक्तिमय वातावरणात करण्यात आली.

यावेळी झालेल्या काल्याच्या किर्तन प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा व त्यांची भक्ती करणाऱ्या संतांचा महिमा विषद करत आषाढी वारीचे महत्व आपल्या कीर्तनातून सांगितले. झालेल्या काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या बाललीलांच्या वर्णनासह त्यांचे चरित्र महिमा किती अगाध आहे याबद्दल महती विषद केली. पंचदिनात्मक सोहळयात योगदान देणाऱ्या दात्यांचा तसेच अन्नदान करणाऱ्या भाविकांचा श्रीफळ प्रसाद देऊन गौरव करण्यात आला. सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी खारीच्या वाटयाप्रमाणे योगदान दिल्याबद्दल आभार मानले.

पंढरपूर

यावेळी झालेल्या पंचदिनात्मक सोहळयाच्या सांगता प्रसंगी उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, जागृती आश्रमाचे महंत श्री शंकरजी महाराज, ऑकारगिरीजी महाराज, घोगरगाव येथील बालब्रम्हचारी श्री विश्वनाथगिरी महाराज, गुरुवर्य उद्धवजी महाराज यांचे पिताश्री विश्वनाथ दादा मंडलिक, देवगडचे संतसेवक हभप नारायण महाराज ससे, हभप गणपत महाराज आहेर, हभप रामनाथ महाराज पवार, हभप संजय महाराज निथळे, मृदुंगाचार्य गिरीजीनाथ महाराज जाधव, लक्ष्मण महाराज नांगरे, रोहित

महाराज पटारे, गणेश महाराज तनपुरे, शशिकांत महाराज कोरेकर, सोमनाथ महाराज पानकडे यांच्यासह देवगड संस्थानचे विद्यार्थी मंडळ सेवेकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरपूर

काल्याच्या किर्तनानंतर उपस्थित हजारो भाविकांना श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाच्या बतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

देवगड येथून निघणारा आषाढी पायी दिंडीचा सोहळा हा कोरोना काळापासून रद्द करण्यात आल्यानंतर पंढरपूर येथील देवगड मठामध्ये विठुरायाच्या पंढरपूर क्षेत्राला दिंडी प्रद‌क्षिणा करून पंचदिनात्मक नामदेव गाथा पारायण सोहळा पंढरपूर येथील देवगडच्या मठात साजरा करण्याची परंपरा गुरुवर्य राष्ट्रसंत भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली असून या सोहळयामुळे वारकरी भाविकांना पारमार्थिक सुखाचा आनंद मिळाला.

पंढरपूर
पंढरपूर

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पंढरपूर
पंढरपूर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पंढरपूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *