नेवासा- तहसीलदारांच्या निवासस्थानाजवळील पीडब्ल्यूडीच्या आवारातून अवैध माती वाहतूक करणारा पकडून लावलेला डंपर चोरून नेण्यात आला. याबाबत तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून तिघांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता. मात्र, २४ तासांत पुन्हा डंपर पीडब्ल्यूडीच्या आवारात जैसे थे बघायला मिळाला.
तहसीलदार संजय पुंडलिकराव बिरादार (वय ४०) यांनी फिर्याद दाखल केली आहे. १० जून रोजी सोनईचे मंडळ अधिकारी प्रशांत कांबळे यांनी विश्वास पटारे (रा. धामोरी, ता. नेवासे) त्याच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाचा डंपर (एम. एच. १६, एई ४७७०) मधून नेवासा बुद्रुक येथे अवैध माती वाहतूक करताना मिळून आला. त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याकरिता डंपर पीडब्ल्यूडी ऑफिसच्या आवारात आणून लावला

होता. ५ जुलै रोजी दुपारी डंपर दिसून आला नाही. तेव्हा जम्बो मार्टचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले. त्यावेळी विश्वास पटारे (रा. धामोरी, ता. नेवासे) व त्याच्यासोबत दोन अनोळखी डंपर घेवून जाताना दिसले. वाहन रिलीज करण्याची परवानगी प्राप्त न करता बेकायदेशीरपणे प्रशासनाच्या ताब्यातील वाहन चोरून नेले. या फिर्यादीवरून नेवासे पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.