गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे एका चौकात एक ३२ वर्षीय अपंग पुरुष जखमी अवस्थेत पडलेला होता . त्यास उपचारासाठी रुग्णवाहिकेतुन अहिल्यानगर येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.दाखल फिर्यादी वरुन गुन्हा र नं. २२/२०२५ बिएनएस चे कलम १९४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री लबडे हे करत आहेत. मयत व्यक्ती ही डाव्या पायाने अपंग आहे. तरी सदर व्यक्ती ही कुणाच्या ओळखीची असेल तर शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनी केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.