नेवासा – “संसाररूपी प्रवाहातून तरून जायचे असेल, तर ब्रह्मस्वरूप सद्गुरूंचा आधार आवश्यक आहे. देव तुम्हाला ऐश्वर्य देईल, पण जीवनाला दिशा देणारे संत ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञानच खरे सहाय्य करते. आणि म्हणूनच पैस खांब हे तत्त्वज्ञानाचे जिवंत प्रतीक आहे!” असे प्रभावी विचार देविदास महाराज म्हस्के यांनी गुरुपौर्णिमा कीर्तनात मांडले
गुरुमाउली संत ज्ञानेश्वरांच्या पावन चरणी वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासत नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तीभावात साजरा करण्यात आला. पहाटेच्या वेळी वेदशास्त्रांचे घोष व अध्यात्मिक वातावरणात पवित्र ‘पैस खांब’ आणि माउलींच्या पादुकांचे पूजन व अभिषेक देवदास महाराज म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर गुरुवर्य बन्सी बुवा तांबे यांच्या प्रतिमेचे पूजन आणि समाधी मंदिरालाही अभिवादन व पूजा करण्यात आली

सकाळी पूजन, आरती, व कीर्तनानंतर दिवसभर हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावत होते. परिसर भक्तिरसात न्हालेला होता.
या उत्सवप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त मंडळाचे विश्वस्त विश्वास मामा गडाख माधवराव दरंदले रामभाऊ जगताप माऊली शिंदे भिकाभाऊ जंगले, कृष्णा अण्णा पिसोटे कैलासराव जाधव तसेच व्यवस्थापक भगवानराव सोनवणे ,रवी जमदडे याशिवाय दिवसभरात वारकरी संप्रदायाचे अंजाबापु कर्डीले, नंदकिशोर महाराज खरात, श्रीहरि महाराज वाकचौरे,गणेश महाराज आरगडे,नवनाथ महाराज आगळे, हरि महाराज भोगे आणि स्थानिक भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जगात अद्वितीय असलेले पसायदान मागणारे ज्ञानेश्वर हेच सर्वश्रेष्ठ सद्गुरु आहेत. पैस खांब म्हणजे ज्ञानेश्वरांच्या तत्त्वज्ञानाचा दीपस्तंभ! जो जो या तत्त्वदर्शनाला शरण जातो, त्याचे जीवन सार्थ होते.
– देविदास महाराज म्हस्के


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.