ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गणेश

नेवासा | सचिन कुरुंद – तालुक्यातील एक होतकरू विद्यार्थी गणेश गोपीनाथ माकोणे याने आपल्या जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. एम.पी.एस.सी. (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) मार्फत घेतलेल्या परीक्षेत यश मिळवून गणेश यांची गृह विभाग, एस.पी. कार्यालयात “डिस्ट्रिक्ट क्लर्क” या पदावर नियुक्ती झाली आहे.

या परीक्षेचे आयोजन डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस विभागांतर्गत करण्यात आले होते. एप्रिल २०२५ मध्ये परीक्षेची प्रथम गुणवत्ता यादी जाहीर झाली होती आणि आज ११ जुलै २०२५ रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली, ज्यामध्ये गणेश माकोणे याने आपले स्थान निश्चित केले.

गणेश

गणेश याने आपले पदवी शिक्षण एम.एससी फिजिक्स या विषयात फर्ग्युसन कॉलेज, पुणे येथून २०२३ मध्ये पूर्ण केले आहे. शिक्षणात सातत्याने गुणवत्ता राखणारा गणेश हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.

गणेशच्या यशात त्यांच्या कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे. त्याची बहीण अपेक्षा माकोणे ही सिटी सर्वे ऑफिस, बीड येथे डाटा ऑपरेटर क्लर्क म्हणून कार्यरत आहे. आई गृहिणी असून वडील तहसील कार्यालय, नेवासा येथे दस्त लेखनिक म्हणून सेवा देत आहेत.

गणेश माकोणे याच्या या यशाबद्दल संपूर्ण नेवासा तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचे हे यश इतर विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शक ठरेल, यात शंका नाही.

गणेश

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गणेश
गणेश

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गणेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *