गणेशवाडी – नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील बनावट अॅप प्रकरणी अखेर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की गेली अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शनिशिंगणापूर बनावट अॅप प्रकरण. संसदेमध्ये देखील यावर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आवाज उठवला होता. या वर उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बाबत दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. दि. १२ रोजी सायबर सेल चे पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यामध्ये त्यांनी सदर गुन्हा दाखल होण्यापूर्वी अर्जाच्या चौकशी दरम्यान त्यामध्ये संशयित अॅप ची नावे दिली होती.

त्या अनुषंगाने नेमलेल्या चौकशी अधिकारी यांनी या अॅप चे मालक यांनी शनैश्वर देवस्थान व धर्मदाय आयुक्त यांची आॅनलाईन दर्शन पुजा बुकिंग करिता कुठल्याही प्रकारे परवानगी घेतलेली नाही व देवस्थानला कोणत्याही प्रकारची देणगी न देता या अॅप चे मालक यांनी त्यांचे साथीदारांसह शनी महाराजांचा फोटो, महाद्वाराचा फोटो तसेच संकेतस्थळ अॅप चे मालक यांचे कोणतेही अधिकृत पुजारी ता ठिकाणी नसताना देखील त्यांचे पुजारी यांचे मार्फत शनी देवाची पूजा, अभिषेक केला जाईल असा खोटा मजकूर संकेत स्थळावर प्रसारित केला आहे. त्या बदल्यात या संकेतस्थळाचे अज्ञात मालक व त्यांचे अज्ञात साथीदार यांनी आॅनलाईन पध्दतीने भाविकांकडून अनियमित दराने रक्कम स्विकारुन देवस्थान व भाविकांची फसवणूक केली आहे.

सदर बाबत वरिष्ठांनी अर्जदार गोरक्षनाथ भिमाशंकर दरंदले सुरक्षा अधिकारी, संस्थानचे कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ केरुजी दरंदले यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधून वरील संकेत स्थळाचे अज्ञात मालक व त्यांचे साथिदार यांचे विरुद्ध फिर्याद देण्यासाठी कळवुन देखील ति न दिल्याने तसेच भाविकांची व संस्थानची फसवणूक थांबविण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने या संकेतस्थळाचे अज्ञात मालक व त्यांचे साथिदार यांचे विरुद्ध देवस्थान व भाविकांची फसवणूक केल्या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल फिर्यादी नुसार गुन्हा र नं.१६५/२०२५ बिएनएस चे कलम ३१८(४), ३३६(३), ३,(५) सह माहिती व तंत्रज्ञान अधिनियम चे कलम ६६(डि) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर सेल चे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम हे करत आहेत.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.