रुग्णालय आपल्या दारी उपक्रमांचा रुग्णांना होणार फायदा.
सोनई – डॉ राजेंद्र धामणे व डॉ संचिता धामणे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षांपासून मनगावला समाजाने दूर लोटलेले मनोरुग्ण, निराधार,विकलांग महिला,बेवारस सोडून दिलेले लहान बालके यांना माऊली प्रतिष्ठानमध्ये हक्काचा आधार दिला जातो
व दुःखाचे सावट असलेल्या निराधारांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करण्याचे काम केले जाते. सामाजिक भावनेतून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा त्यांना समाजातील गरजूप्रती कृतज्ञता भावना निमार्ण व्हावी या हेतूने व डॉ राजेंद्र धामणे व डॉ सुचेता धामणे कुटूंबाने निस्वार्थ हेतूने सुरू केलेल्या समाजसेवेच्या व्रतास आपला हातभार लागावा या हेतूने आठवड्यातुन दोन दिवस बुधवार व गुरूवारी यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयाचे सॅटेलाइट क्लिनिकची सेवा देण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ञ व अनुभवी डॉक्टर्स व दंत महाविद्यालयातील विद्यार्थी डॉक्टर्स हे याठिकाणी सेवा देणार आहेत व रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत.

या सेवेचे लोकार्पण डॉ राजेंद्र धामने व डॉ सुचेता धामने यांच्या हस्ते व नेवासा तालुक्याच्या माजी सभापती सौ सुनीताताई शंकरराव गडाख, यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयच्या उपाध्यक्षा नेहल प्रशांत गडाख यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालयास माऊली प्रतिष्ठानमध्ये सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नेहल गडाख यांनी आभार मानले. याप्रसंगी डॉ राजेंद्र धामने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला व या उपक्रमामुळे मुलामध्ये सामाजिक भावना निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले. दंत महाविद्यालयाने सुरू केलेले सॅटेलाईट क्लिनिक माणगावमधील रुग्णांना उपयुक्त होणार असल्याचे मा सभापती सौ सुनीताताई गडाख म्हणाल्या. महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ नीलिमा राजहंस,डॉ श्रीपाद राजहंस ,डॉक्टर्स आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.