नेवासा – ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार भूपेंद्र राजाराम सावळे ऊर्फ भूपेंद्र पाटील याला नंदुरबार पोलिसांनी अटक केल्यानंतर रविवारी शिर्डीत आणण्यात आले. शेकडो ठेवीदारांची फसवणूक करून पलायन केलेल्या भूपेंद्रला शिर्डीत आणून पोलिसांनी त्याचा आलिशान बंगला सील केला.
शिर्डीतील साई संस्थानचे तब्बल १,३०० कर्मचारी आणि पंचक्रोशीतील शेकडो ठेवीदार यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या फसवणुकीमुळे शिर्डीत संतापाची लाट पसरली असून नागरिकांमध्ये चीड आणि – नैराश्याचे वातावरण आहे.

भूपेंद्रसह त्याचे वडील, भाऊ यासह सात जणांविरोधात नंदुरबार, शिर्डी आणि राहाता पोलिस ठाण्यात महाराष्ट्र संरक्षण ठेवीदार अधिनियमासह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. मात्र, भूपेंद्र वगळता इतर आरोपी अद्याप पसार आहेत. या फसवणुकीची व्याप्ती राज्यातील अनेक जिल्ह्यात असून गुंतवणूकदार हळूहळू पुढे येत आहेत.
शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांनी इतर पसार आरोपी आणि या प्रकरणातील दलालांना तातडीने. अटक करावी, तसेच गोरगरीब ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये कुठे गेले याचा कसून तपास करावा, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणामुळे शिर्डी परिसरात विश्वासाला मोठा तडा गेला गुंतवणूकदारांच्या असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी आणि ठेवीदारांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.