नेवासा | सचिन कुरुंद – समाजातील दिन दुबळ्यासाठी सामाजिक जाणिवेतून मदतीसाठी पुढे येणारे दातृत्वाचे हात अतिशय महत्वाचे व लाख मोलाचे असतात, असे अखिल भारतीय महिला आघाडीच्या राज्य अध्यक्ष कॉ. स्मिता पानसरे म्हणाल्या.
संत गाडगेबाबा रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन संचालित साऊ एकल माहिला नेवासा तालुका समितिच्या वतीने एकल ( विधवा ) महिलांच्या गरजवंत मुलांना शालेय साहित्य संच वाटप कार्यक्रमात पानसरे प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होत्या. नागेबाबा भक्तनिवास, भेंडा येथे झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नरेंद्र घुले पाटील स्पोर्ट अकॅडमीचे अध्यक्ष युवा कार्यकर्ते किशोर मिसाळ होते. व्यासपिठावर प्रमुख अतिथी इंजिनियर बाळासाहेब कचरे पाटील, सराफ योगेश लोळगे , मारुतराव घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस, सराफ अवधूत लोहकरे, सराफ सागर पंडीत, कावीळ तज्ञ सुनिलराव वाबळे, सेवानिवृत्त प्रा.आर. के.सानप आदींची उपस्थिती होती.

स्मिता पानसरे म्हणाल्या की, एकल महिलांच्या समस्या व अडचणी मोठ्या प्रमाणात असून फॉउंडेशन च्या माध्यमातून एकल समिती करत असलेले कार्य अत्यावशक व महत्वपुर्ण असेच आहे. या घटकांच्या गरजा तसेच एकल महिला निर्माण होऊच नये म्हणून तरुणांनी समाज जागृती व प्रबोधन करावे. पुरुष कधीच एकल रहात नाही, मात्र महिला सहन करतात , अशीही खंत व्यक्त करून एकल महिलांनी पुनर्विवाहाचा पर्याय निवडावा असेही आवाहन केले .
संत गाडगेबाबा फाउंडेशनचे अध्यक्ष कारभारी गरड यांनी प्रास्ताविक मधून एकल महिला त्यांची मुले यांच्या समस्या व समिती समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्ययाने करत असलेल्या कामाची माहिती दिली.

उपाध्यक्ष रेणुका चौधरी, कोषाध्यक्ष भारत आरगडे यांनी प्रमुख वक्ते व अतिथीचा परिचय दिला. सेक्रेटरी आप्पासाहेब वाबळे यांनी सूत्रसंचालन केले.एकल महिलांच्या पहिली ते दहावी मधील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय दप्तर बॅग, वह्या,पेन,कंपास, चित्रकला साहित्य, पॅड, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली, टिफिन बॅग, गणवेश वाटप करण्यात आले. एकूण 42 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संच बाळासाहेब कचरे, बबनराव धस, योगेश लोळगे,सागर पंडित, अवधूत लोहकरे, सुनिलराव वाबळे, धोंडीराम भिसे आदींचे हस्ते वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमात सेवानिवृत्त प्रा.आर. के.सानप, प्रमुख अतिथी इंजिनिअर बाळासाहेब कचरे, बबनराव धस,कार्यक्रमाचे अध्यक्ष किशोर मिसाळ आदींनी अशा उपक्रमाची गरज असून संत गाडगेबाबा फाउंडेशनचे चालू असलेले कार्यास आवश्यक तेव्हा मदत करण्याचे आश्वासन दिले .कार्यक्रम यशस्वितेसाठी लक्ष्मण आरगडे, सचिन चौधरी,येडुभाऊ सोनवणे, राजेंद्र चिंधे, रेणुका चौधरी, चित्रा उगले, पुष्पा आरगडे, कृष्णा टाक,राहुल भिसे, रंजना गोर्डे,आदींनी विशेष परिश्रम घेतले. सह कॊषाध्यक्ष लक्ष्मण आरगडे यांनी आभार मानले.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.