नेवासा – तालुक्यातील गोधेगाव येथील जुन्या पिढीतील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा भक्त मंडळाचे सदस्य व देवगड संस्थानचे जेष्ठ सेवेकरी श्रीधर मुरलीधर जाधव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी अकस्मात निधन झाले. श्रीधर जाधव हे देवगड संस्थानच्या प्रसादालय विभागात सेवा देत असत ते स्वःत एक आचारी असल्याने धार्मिक व उत्सवाच्या कालावधीत हजारो भाविकांना प्रसाद वाटपाचे नियोजन ते स्वःत सेवेकऱ्यांना बरोबर घेऊन करत असे,
श्रीधर जाधव यांच्या पश्चात चार मुली, तीन मुले, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. देवगड येथील गुरुवर्य भास्करगिरी बाबांचे मुख्य चोपदार बाळू महाराज कानडे यांचे ते सासरे तर गोधेगाव येथील संतसेवक स्वर्गीय सीताराम नाना जाधव पाटील यांचे ते जेष्ठ बंधू होते. श्रीधर जाधव यांच्या अकस्मात निधनाने भक्त परिवारामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.