पाचेगाव फाटा – नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे शुक्रवार दिनांक 18/ 7/ 2025 रोजी गावात नव्याने बांधण्यात आलेल्या श्री संत सावता महाराज मंदिरात सावता महाराज यांची वंशज रमेश महाराज वसेकर श्रीक्षेत्र अरण, विश्वनाथ गिरी महाराज, हरीच्या रंगीली महाराज बाजाठाण, यांच्या शुभहस्ते या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराज विठ्ठल रुक्मिणी नामदेव महाराज तुकाराम महाराज गोरोबाकाका यांच्या नवीन मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा सकाळी अकरा वाजता होणार आहे यांच्या. यावेळी गावातील पाटील महाराज सरोदे महाराज,तऱ्हाळ महाराज,अंधारे महाराज हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे. त्यानंतर चंद्रशेखर गटकळ यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 23/7/2025 रोजी. सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य गणेश महाराज गायकवाड यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होणार आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे संत सावता महाराज मित्र मंडळ बेलपिंपळगाव,टाकळी भान, जैनपूर, घोगरगाव, बेलपांढरी भजनी मंडळांनी सांगितले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.