नेवासा – नेवासा खुर्द येथे अवैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर तसेच टेम्पोवर परी. पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाने कारवाई करत, २७ लाख १६ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परी. पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांना नेवासा खुर्द येथे ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस एका पांढऱ्या रंगाच्या डंपर मधून अवैध वाळू वाहतूक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे तात्काळ पोलीस पथकाने नेवासा खुर्द येथे ज्ञानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस जावून सापळा लावला. काही वेळाने त्यांना एक पांढऱ्या रंगाचा वाळूने भरलेला डंपर त्यांना येताना दिसला. त्यास थांबून त्याच्यावरील चालकास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता, त्याने सोमनाथ लक्ष्मण पवार (वय ३४, रा- खडका फाटा) असे सांगितले.

डंपर पकडलेला पाहून एक इसम किया कारमधून पळून गेला. याबाबत डंपर चालकास विचारले असता, त्याने तो डंपर मालक असल्याचे सांगून त्याचे नाव राहुल शिंदे असल्याचे सांगितले. तसेच पकडलेल्या डंपर मागून पुन्हा एक वाळूने भरलेला टेम्पो येताना दिसला. त्यालाही थांबवून त्यावरील चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने सागर माळी (वय २०) असल्याचे – सांगितले. पकडलेला सर्व मुद्देमाल नेवासा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सदर ठिकाणाहून २७लाख १६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी सोमनाथ पवार, राहुल शिंदे, सागर माळी, नामू कुसळकर, छोटू लष्करे आदींवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३/१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

