कामिका एकादशी

नेवासा – कामिका एकादशीच्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिरात दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक पैस खांबा पुढे नतमस्तक होतात. यंदा लाखो अधिक भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता नेवासा शहर, परिसर आणि प्रशासन सज्ज होऊ लागले आहे. भाविकांच्या सुविधांसाठी नियोजनबद्ध पद्धतीने विविध विभागांनी समन्वय साधून तयारी सुरू केली आहे.
तहसील कार्यालयात नुकतीच नियोजन बैठक आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या सूचनेनुसार पार पडली. बैठकीस तहसीलदार संजय बिरादार, संत ज्ञानेश्वर मंदिर ट्रस्टचे प्रतिनिधी रवींद्र जमधाडे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, नगरपंचायतचे मुख्याधिकारी संतोष लांडगे, परिवहन विभागाचे प्रशांत होले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे बी. टी. सोनवणे, आरोग्य विभागाचे पुंड, महावितरणचे राहुल बडवे आणि व्हि पी कानडे, महसूल मंडळाधिकारी अनिल गव्हाणे व तलाठी परदेसी हे अधिकारी उपस्थित होते.

कामिका एकादशी


रस्त्यांची डागडुजी, मंदिर परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, मोबाईल टॉयलेट्स, पार्किंग व्यवस्था, अग्निशामक व्यवस्था, आरोग्य पथकांची नियुक्ती, वाहतूक नियंत्रण आणि पोलिस बंदोबस्त या सगळ्या यंत्रणा भाविकांची सेवा आणि सुरक्षितेच्या दृष्टीने करावयाच्या उपाय योजना या बाबत बैठकीत नियोजन करण्यात आले.
नेवासा नगरपंचायत, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, परिवहन आणि महावितरण विभाग एकत्रितपणे कार्यरत होऊन भाविकाला कोणतीही अडचण होऊ नये, गर्दी सुरळीत वाहती राहावी, यासाठी तयारी सुरू करणार आहे.
नेवासा शहर आता कामिका एकादशीसाठी येणाऱ्या लाखो भाविकांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत आहे

कामिका एकादशी
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

कामिका एकादशी
कामिका एकादशी

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

कामिका एकादशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!