नेवासा : दिव्यांग बांधवांचे जीवन अधिक स्वावलंबी व सुसज्ज करण्याच्या उद्देशाने गुरुवार (दि.१७) रोजी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात कृत्रिम अवयव वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला दिव्यांग बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिराच्या अध्यक्षस्थानी सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे-पाटील या होत्या. दिव्यांगांना आधार देवून स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आमदार लंघे यांचे झाले कौतुक यावेळी करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय व जिल्हा परिषद, अहमदनगर तसेच जिल्हा रुग्णालय भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को), कानपूर, व एस. आर. ट्रस्ट, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आलेला होता.

नेवासा तालुक्यातील विविध गावांतील अस्थिव्यंग लाभार्थ्यांना कृत्रिम हात, पाय व कॅलिपर्स यांचे मोजमाप घेऊन तात्काळ मोफत वितरण करण्यात आले. सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत पार पडलेल्या या शिबिरात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या धर्म पत्नी सौ. रत्नमालाताई लंघे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी झालेल्या शिबीर प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या डॉ तेजश्रीताई लंघे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रतापदादा चिंधे, मार्केट कमिटी माजी सभापती शंकरराव लोखंडे, भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे, मनोज पारखे, भाजपा महिला आघाडीच्या अमृताताई नळकांडे, डॉ. मनीषा वाघ, भारती बेंद्रे, शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभा आलवणे, सौ. भारती कर्डक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. काटे, आरोग्य अधिकारी डॉ. दीपक डिंबर, डॉ. मोहसिन बागवान, डॉ. अविनाश काळे, हरिभाऊ जगताप, बाळासाहेब पिसाळ, सतीश शिरसागर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.