अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नेवासा –नेवासा तालुक्यातील वरखेड येथे लक्ष्मीदेवीच्या आषाढ यात्रेनिमिताने १८ जुलै रोजी १२ गाड्या ओढण्याचे नियोजन केले आहे. या बारा गाड्या ओढण्याचे आयोजकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांचेकडे केली आहे.
अंनिसच्या राज्य प्रधान सचिव अॅडः रंजना गवांदे, राज्य समन्वयक कॉ. बाबा आरगडे,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वरखेड येथे लक्ष्मीदेवीचे देवस्थान आहे. येथे आषाढ महिन्यात १२ गाड्या. यान्त्राः भरविली जाते.

या यात्रे निमिताने मंदिराचे परिसरात उघड्यावर पशुहत्या मोठ्या प्रमाणात होते. या यात्रेनिमित्त लक्ष्मीदेवी ट्रस्टचे सचिव व पुजारी यांनी १८ जुलै रोजी १२ गाड्या ओढण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी १२ गाड्या ओढताना मोठा अपघात होऊन अनेकांचा बळी गेला आहे. १२ गाड्या ओढण्याची ही अंधश्रध्दा /कृती गावकऱ्यांसाठी जिवघेणी ठरत आहे. पुन्हा असे अपघात होऊ नये. म्हणून आयोजकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी अंनिस च्या वतीने केली. संजय वाल्हेकर, रामकिसान बनकर, अशोकराव गवांदे, विजय शिरसाठ, अंकुश कुंडारे आदी यावेळी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.