ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
लंघे

नेवासा –विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे यांनी गुरुवार दि.१७ रोजी पावसाळी आधिवेशनात या बाबद औचित्याचा मुद्दा उपस्थित केला.

आ. लंघे म्हणाले की, माझ्या नेवासा मतदार संघात मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसाने शेती पिकांचे प्रंचड नुकसान होवून गोरगरीबांच्या घरांची सोसाट्याच्या वाऱ्याने प्रचंड दाणादान होवून पडझड झालेली आहे. तसेच अवकाळी पावसाने व वाऱ्याने कांदा, केळी, सोयाबीन आणि बाजरी या मुख्य पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचा लाभ सरसकट व तात्काळ मिळावी अशी मागणी विधानसभेच्या सभापतींकडे केली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईची आशा पल्लवित झाली आहे.

लंघे

यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी विधानसभेच्या सभापतींचे विशेष लक्ष वेधतांना ते म्हणाले की, माझा नेवासा तालुका हा ग्रामीण स्वरूपाचा भाग असून सुमारे ८० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि माहे मे आणि जून २०२५ दरम्यान अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून घरांची पडझड झालेली आहे असा मुद्देसुद प्रश्न सभापतींकडे उपस्थित केल्यामुळेशेतकऱ्यांच्या आशा सरकारच्या भूमिकेडे लागून आहेत.

लंघे
लंघे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

लंघे
लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *