नेवासा – येत्या सोमवार, दिनांक 21 जुलै 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या कामिका एकादशीच्या निमित्ताने नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या मार्गदर्शनानुसार सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शहरातील मार्केट यार्ड व परिसरात दिशादर्शक फलक उभारण्यात आले व रस्ता दुरुस्तीची काम देखील करण्यात आले आहेत.
या उपक्रमाद्वारे भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचण्यास अधिक सुलभता निर्माण होणार आहे. सदर दिशादर्शक फलक व रस्ता दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बी. टी. सोनवणे साहेब उपअभियंता सोलट साहेब यांच्या मार्गदर्शनात लावण्यात आले.

या कार्याबद्दल संत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान, नेवासा यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.
” कामिका एकादशीच्या निमित्ताने मंदिरात होणाऱ्या भक्तीमय कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असून, हा उपक्रम भक्तांना योग्य मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.”
-पांडुरंग अभंग, अध्यक्ष, श्री संत ज्ञानेश्वर संस्था नेवासा.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.