नेवासा – शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांना मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नोटीस बजावून दि. १८ रोजी मुंबई धर्मादाय कार्यालयात म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्यासाठी सांगितले होते, शुक्रवार दि. १८ रोजी विश्वस्तांच्या वतीने वकीलांनी म्हणणे मांडले व पुढच्या तारखेची मागणी केली, असता दि. २५ तारीख देण्यात आली असून या तारखेला म्हणणे मांडण्याचे सांगितले आहे.
नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे व आ. सुरेश धस यांनी विधानभवनात लक्षवेधी सूचनेत शिंगणापूर येथे अॅप घोटाळा व नोकर भरतीतील भ्रष्टाचार मांडला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना घोटाळ्याची माहीती दिली, व लवकर विश्वस्त मंडळावर कारवाई करून विश्वस्त बरखास्त करण्यात येणार असल्याचे सांगितले.

दुसऱ्याच दिवशी अहिल्यानगर सायबर शाखेने शिंगणापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर फिर्याद दाखल केली. त्यानंतर मुंबई येथील धर्मदाय कार्यालयाने सर्व ११ विश्वस्तांना नोटीस बजावून दि. १८ रोजी म्हणणे मांडण्यासाठी सांगितले होते. पण, नोटीस मध्ये कोणत्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे याचा उल्लेखच नसल्याने विश्वस्त मंडळ वकिलांच्या माध्यमातून सुनावणीसाठी हजर राहिले. कोणत्या प्रकारची माहिती पाहिजे असे, मत व्यक्त केले. त्यावर नोकर भरती प्रकरणी माहितीची मागणी करत पुढील तारीख मिळण्याचीही मागणी विश्वस्तांच्या वतीने वकीलांनी केली होती. आता दि. २५ जुलै तारीख देण्यात आली असून या तारखेला नोकर भरती प्रक्रीया कोणत्या प्रकारे राबविली याचे उत्तर मागितले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.