नेवासा –नेवासा येथे सोमवार दि. २१ जुलै रोजी कामिका एकादशी निमित्ताने. पैस खांबाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता, प्रशासनाने शहरातील वाहतूक मार्गात बदल केला आहे.
यावर्षी एकादशीनिमित्ताने होणारी गर्दी लक्षात घेता. नेवासा शहरातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. नेवासा फाटा ते श्रीरामपुरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नेवासा फाटा-प्रवरासंगम-सिद्धेश्वर मंदिर-वाशिम-टोका-गोधेगाव- भालगांव- नेवासा बुद्रुक-टाकळीभान-श्रीरामपूर, श्रीरामपूर ते नेवासा फाटा ते शेवगावकडे जाणाऱ्या वाहनांसाठी श्रीरामपूर – टाकळीभान-नेवासा बुद्रुक- भालगाव- गोधेगाव-वाशिम टोका- सिध्देश्वर मंदिर-प्रवरासंगम- नेवासा फाटा-शेवगाव असा बदल करण्यात आला आहे. वरील आदेश शासकीय वाहने, अॅम्बुलन्स, फायर ब्रिगेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही.

भाविकांच्या वाहनांसाठी पार्कंगचीही व्यवस्था करण्यात आली आहे. नेवासा फाट्याकडून कृषी येणाऱ्या वाहनांसाठी उत्पन्न बाजार समितीचे ग्राउंड, श्रीरामपुरकडून येणाऱ्या वाहनांसाठी नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा, राहुरी-खुपटीकडून येणाऱ्या वाहनांसाठी खुपटी रोड बरील ईदगाह मैदान, केवळ दुचाकी वाहनांसाठी नेवासा शहरात एस.टी. स्टँड, पंचायत समिती मैदान आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, स्थानिक रहिवाशांनी २१ जुलै रोजी चारचाकी वाहनांचा उपयोग टाळावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
कामिका एकादशीनिमित्ताने श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराज देवस्थान येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांच्या प्रवासाची गैरसोय होऊ नये, म्हणून नेवासा बस आगाराचे आगार व्यवस्थापक प्रशांत होले यांनी नेवासा बस आगारातून नेवासा ते रामडोह, नेवासा ते गंगापूर, नेवासा ते कुकाणा, नेवासा ते घोडेगाव, नेवासा ते सोनई, नेवासा ते शेवगाव या मार्गावर जादा बसचे नियोजन केले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.