नेवासा |सचिन कुरुंद – नेवासा दिनांक 17 जुलै 2025 रोजी प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 2.0 (PMAY-U 2.0) अंतर्गत नेवासा नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रात आयोजित माहिती व लाभनोंदणी कॅम्पला स्थानिक लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या विशेष कॅम्पमध्ये विविध घटकातील गरजू नागरिकांनी सहभागी होऊन घरकुल योजनेसाठी आवश्यक माहिती आणि मार्गदर्शन मिळवले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शकील पठाण, सतीश गायके, सचिन नागपुरे, डॉ. सांगळे, डॉ. घुले हे मान्यवर उपस्थित होते. याचबरोबर शहर स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ व स्थापत्य अभियंता श्री. राहुल आढाव यांनी देखील उपस्थित राहून तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले.

प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 2.0 ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असून, 1 सप्टेंबर 2024 पासून देशभरात लागू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश येत्या पाच वर्षांमध्ये शहरी गरीब, मध्यमवर्गीय व स्थलांतरित कामगारांसाठी 1 कोटी परवडणारी व सुरक्षित घरे निर्माण करणे हा आहे. ‘सर्वांसाठी घर’ या संकल्पनेला पूरक अशी ही योजना असून, EWS, LIG व MIG गटांसाठी राबवली जात आहे.
योजनेअंतर्गत लाभार्थी आधारित घरबांधणी (BLC), परवडणारी भागीदारी घरे (AHP), परवडणारी भाडेकरू घरे (ARH), आणि व्याज अनुदान योजना (ISS) असे चार मुख्य घटक आहेत. विशेष म्हणजे महिला, विधवा, दिव्यांग, तृतीयपंथी व अनुसूचित जाती-जमातींना प्राधान्य देण्यात येणार आहे. घराच्या मालकीसाठी महिलांचे नाव असणे अनिवार्य असून, पारदर्शकतेसाठी Geo-tagging व आधार आधारित ओळख प्रक्रिया करण्यात येणार आहे.

योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अधिकतम ₹1.80 लाख इतकी व्याज सवलत मिळू शकते. या योजनेसाठी घराची किमत ₹35 लाखांपर्यंत व कर्ज मर्यादा ₹25 लाखांपर्यंत असावी लागेल.
नेवासा नगरपंचायतीमार्फत अशा उपक्रमांद्वारे अधिकाधिक पात्र नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असून, यासाठी शहरस्तरावर सतत जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. यावेळी अनेक लाभार्थ्यांनी आपली नोंदणी करून योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतला.
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.