ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
गणेश

नेवासा | सचिन कुरुंद – एम पी एस सी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गणेश गोपीनाथ माकोणे याचे विविध क्षेत्रातून कौतुक व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

नेवासा तालुक्यातील एक होतकरू विद्यार्थी गणेश गोपीनाथ माकोणे याने आपल्या जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर मोठे यश मिळवले असून एम.पी.एस.सी. मार्फत गणेश यांची गृह विभाग, एस.पी. कार्यालयात “डिस्ट्रिक्ट क्लर्क” या पदावर नियुक्ती झाली आहे. नेवासा तालुक्यात सर्व क्षेत्रात शैक्षणिक अध्यात्मिक वैद्यकीय न्यायालयीन अशा सर्व क्षेत्रातून गणेश चे कौतुक होत असून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे श्री क्षेत्र देवगड येथे बाबाजींचा आशीर्वाद घेण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी कौतुक करून आशीर्वाद दिले.

गणेश

गणेश ज्या कॉलनीत राहतो त्या ठिकाणी बिरोबा नवरात्र उत्सव मंडळाने मोठा सत्कार समारंभा वेळी आतिश बाजी केली पेढे वाटून त्याचे कौतुक करून खूप शुभेच्छा दिल्या श्री टेमक सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारून भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन श्री सुहास टेमक यांनी केले व आभार सचिन नागपुरे यांनी मानले यावेळी अनेक ज्येष्ठ मान्यवर उपस्थित होते सर्वच क्षेत्रातील पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केले गणेशची वडील व आईचे अभिनंदन करून सत्कार करण्यात आला
सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून अभिमान वाढेल असे यश गणेशाने मिळवले असून आई-वडिलांचा सन्मान अगणित केला असे प्रत्येकाच्या तोंडून ऐकण्यास मिळाले
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना गणेश म्हणाला की अध्यात्म बरोबर आई-वडिलांचे आशीर्वाद आणि त्यांचे प्रेरणा माझा उत्साह वाढत होती आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या आई-वडिलांमुळे आहे असे बोलताना तो भावुक झाला. हा माझा सन्मान नसून माझ्या वडिलांचा आहे असे तो बोलला विद्यार्थ्याने मोबाईलचा योग्य वापर करून सातत्यपूर्ण अभ्यास करून यश संपादन करावे अशी त्याने इच्छा व्यक्त केली

गणेश

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

गणेश
गणेश

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

गणेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *