नेवासा : संत ज्ञानेश्वर महाराज,विठ्ठल- रुख्मिणीसह विविध संतांच्या वेशभूषा साकारत कामीका एकादशी निमित्त शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा मुलींच्या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थिनींनी ज्ञानोबा माऊलींचा शहरातून दिंडी काढत रिंगण सादर केले.
कामिका एकादशीनिमित्त सोमवारी शहरात यात्रोत्सव होत आहे.त्या पार्श्वभूमीवर शाळेच्या मुख्याध्यापिका मालनबाई कोळपकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी सोहळा आयोजित केला होता.यामध्ये सुमारे दोनशे विद्यार्थिनी वेशभूषा करत सहभागी झाल्या होत्या.यामध्ये विद्यार्थिनींनी विठ्ठल- रुख्मिणी,संत ज्ञानेश्वर,निवृत्तीनाथ,सोपानदेव,मुक्ताबाई,संत तुकाराम महाराज,जनाबाई तसेच वारकरी वेशभूषा करत दिंडीत सहभाग घेतला.

शाळेपासून निघालेली ही दिंडी मोहिनिराज मंदिर, नगरपंचायत चौक येथून संत ज्ञानेश्वर मंदिरात गेली.दरम्यान नगरपंचायत चौकात या बाल वारकऱ्यांनी रिंगण सादर केले.संत ज्ञानेश्वर मंदिर येथे गेल्यानंतर संस्थानचे जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे व शिवाजी होन यांनी दिंडीचे स्वागत केले.संत ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात विद्यार्थिनी व शिक्षकांनी फुगडी खेळत रिंगण सादर केले.
यावेळी विद्यार्थिनींना फराळ वाटप करण्यात आले.या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मालनबाई कोळपकर,वैशाली कुलट,मनीषा जवणे,ज्योती बोरूडे,वर्षा जगताप,शरद मचे,विजय साळुंके,सुधाकर झिने यांच्यासह शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचे सहकार्य लाभले.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.