जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन
नेवासा –आज नेवासा भारतीय जनता पार्टी शहर मंडलाच्या वतीने नेवासा शहर मनोज पारखे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन नेवासा शहर येथे अहिल्यादेवी मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले उद्घाटन प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब व नेवासा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले . रक्तदान शिबिराचा नेवासा शहरातील अनेक तरुण वर्गाने देत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले.

याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, नेवासा भारतीय जनता पार्टीचे युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे, प्रताप चिंधे,जिल्हा उपाध्यक्ष सचिन भाऊ देसरडा बाळासाहेब पवार,अशोक कोळेकर, अंकुश भांगे ,डॉ. बाळासाहेब कोलते, रक्तपेढीसाठी विशेष सहकार्य डॉ. निलेश लोखंडे , भाजप महिला आघाडी प्रदेश सचिव अमृताताई नळकांडे डॉ. मनीषाताई वाघ, शिवाजी लष्करे नानासाहेब डौले,रामदास लष्करे,सचिन काळे आदिनाथ पटारे,सुधाकर शेंडे, शोभाताई आलवणे, गणेश चौगुलेआदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.