ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
पोलीस

गणेशवाडी – ग्रो मोअर इन्व्हेसमेन्ट फायन्सास कंपनी शिर्डी या कंपनीचे संचालक व इतरांनी चांगला परतावा देतो
असे अमीष दाखवुन व फिर्यादीचा विश्वास संपादन करुन एकुण ८ लाख रुपयांची फसवणुक करुन ते पसार झाले आहे. त्यानुसार राहाता पोलीस ठाण्यात गु. र. नं. २७३/२०२५ बी. एन. एस. २०२३ चे कलम ३१८(२). ३१८ (४), ३१६(२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
सदर गुन्हयाचा तपासात आरोपी भुपेंद्र राजाराम सावळे, वय २७ वर्षे, रा. नांदुर्खी रोड, साईभक्ती भुषण निवास, श्रीकृष्णनगर, शिर्डी ता. राहाता जि. अहिल्यानगर याचेकडे सदर तपासाचे अनुषंगाने चौकशी केली असता. त्याने शेअर मार्केटच्या चढ उतारामध्ये मोठया प्रमाणात घाटा झाल्यामुळे गुंतवणुकदारांचे पैसे परत करु शकलो नाही.

पोलीस

त्याच्या कडील जनतेच्या ठेवी व परतावाबाबत माहिती विचारली असता त्याने सांगितले की, दि १५जानेवारी रोजी मला स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई धाकराव व त्याच्या सोबतच्या तीन पोलीस कर्मचारी यांनी मी. माझे दोन भाऊ व मित्र असे नाशिक कडे फॉर्च्यूनर गाडीने जात असतांना लोणी जवळ अडवुन म्हणाले, तुझ्या कडे कोणतेही आरबीआय चे लायसन्स नसतांना जनतेकडुन पैसे गोळा करून त्यांची फसवणूक करतो म्हणून तुझ्यावर गुन्हा दाखल करतो. मी त्याना माझ्यावर कोणती ही कार्यवाही करु नका मी कोणाची ही फसवणूक केलेली नाही, मला विनाकारण कोणत्याही खोटया गुन्हयात अडकवुन नका, त्यावर ते व त्यांचे सोबतचे कर्मचारी मला म्हणाले तुला जर यातुन सुटायचे असेल तर तु आंम्हाला १ कोटी ५० लाख रुपये नगद स्वरुपात दे. त्यावर मी धाकराव साहेब व सोबतच्या कर्मचारी यांना माझ्याकडे नगद स्वरुपात पैसे नाहीत, मी नगद पैसे देवु शकत नाही असे म्हणालो.

पोलीस

त्यांनतर धाकराव साहेब व सोबतच्या पोलीसांनी मला व माझे सोबतचे माझे २ भाऊ व मित्र यांना अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे आवारातील पार्कींगमध्ये घेवून आले. तेथे थांबल्यावर धाकराव साहेबांनी मला ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये दया असे सांगितले. त्यावर विनाकारण एखादया खोटया गुन्हयात अडकण्यापेक्षा पोसई धाकराव साहेंबांनी सांगीतले प्रमाणे, त्यांनी दिलेल्या अकाउंटवर मी ऑनलाईन १ कोटी ५० लाख रुपये ट्रान्सफर केले आहे अशी आरोपीने माहिती दिली असता, त्या बाबत तपासादरम्यान चौकशी केली असता पोसई धाकराव व त्यांचे सोबतचे तीन पोलीस अंमलदार यांनी सदर गैरकृत्य केल्याचे सकृतदर्शनी दिसुन आले आहे.
तपास अधिकारी यांनी दिलेल्या अहवालावरुन २१रोजी पो.स. ई. तुषार छबुराव धाकराव, व पोलीस अंमलदार १) पो.हे.कॉ. / २१४५ मनोहर सिताराम गोसावी, २)पो.हे.कॉ./४८६ बापुसाहेब रावसाहेब फोलाणे, ३) पो.हे.कॉ. / १२९३ गणेश प्रभाकर भिंगारदे सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना शासन सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. सदर बाबतची प्राथमिक चौकशी सुरु करण्यात येवुन प्राथमिक चौकशी अधिकारी म्हणुन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांचेकडे देण्यात आली आहे.

पोलीस
पोलीस

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

पोलीस
पोलीस

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

पोलीस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *