सोनई –सदगुरू नारायणगिरी आश्रम नेवासा बु ,सुरेगाव गंगाचे महंत उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांचा रवि दि 20 जुलै 2025 रोजी सकाळी 10:00 वाजता,महाराष्ट्र राज्य वारकरी कीर्तनकार गोलमेज परिषद श्री क्षेत्र आळंदी येथे संपन्न झाली.गोलमेज परिषदेवर नियुक्ती झाल्याबद्दल गुरुवर्य ह.भ.प.महंत उद्धवजी महाराज मंडलिक, नेवासेकर यांचा डॉ. राहुल विश्वनाथ कराड सर (कार्यकारी अध्यक्ष,एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे) यांनी सन्मान केला. यावेळी उद्धव महाराज मंडलिक म्हणाले गोलमेज परिषदेवर झालेली निवड एक अभिमानास्पद क्षण आहे.

या माध्यमातून वारकरी संप्रदायासाठी काम करता येणार आहे.
संत महंताच्या आशीर्वादाने
वारकरी संप्रदायासाठी अखंड कार्यमग्न राहणार असल्याचे ते म्हणाले
या प्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळींनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर सर, डॉ. राहुल विश्वनाथ कराड ,साहित्यिक व संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे , पद्मश्री पोपटराव पवार व राज्य भरातून आलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील निवडक मान्यवर मंडळी उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.