नेवासा – पावन कामिका एकादशीच्या शुभदिनानिमित्त संकल्प प्रतिष्ठानम् या नव्याने कार्यरत झालेल्या सामाजिक संस्थेच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात आले. हे प्रतिष्ठानाचे पहिलेच वर्ष असूनही सदस्यांनी उत्साहात सहभाग घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
या उपक्रमात भाविकांना केळी, राजगिऱ्याचे लाडू आणि थंड पाण्याचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत सातत्याने पाण्याची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली होती.

कार्यक्रमात पुढील सदस्यांनी सक्रिय सहभाग घेतला —
प्रतीक जाधव, राहुल कोकणे, ओमकार कोकणे, यश बोरकर, संकेत कवडे, ओम फुलकर, वैभव शेंडे, माऊली कुटे, गोविंद कदम, गौरव गडाख, गणेश शेजुळ, रामहरी शेंडे, सिद्धार्थ सावंत, अनिकेत पटारे, शुभम पेहरे— या सर्वांनी एकजुटीने सेवा बजावत भाविकांची मनपूर्वक सेवा केली.
संस्थेचे घोषवाक्य “एकता बलं, मैत्री आधारः, प्रगती लक्ष्यम्” यानुसार संकल्प प्रतिष्ठानम् भाविकांसाठी सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक योगदान देण्यास कटिबद्ध आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.