संत तुकाराम महाराज मंदिर ते ज्ञानेश्वर मंदिर परिसरात राबवले स्वच्छता अभियान.
सोनई –संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथाची निमिर्ती केलेल्या पैस खांब मंदिरात कामिका एकादशी निमित्त मोठी यात्रा भरते
सोम दि 21 जुलै 2025 रोजी कमिका एकादशी निमित्त लाखो वारकऱ्यांनी पैस खांबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती रात्री पर्यत ज्ञानेश्वर महाराज मंदिर परिसरात मोठी गर्दी होती. यात्रा झाल्यानंतर फुला,फळांची दुकाने ,खाऊंची दुकाने,फराळ वाटप केल्यावर उरलेल्या पत्रावळ्या, द्रोण यामुळे मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य साचते हे निर्माल साफ करणे मोठे जिकिरीचे काम होते. एकादशी नंतर मंदिर परिसर स्वच्छ रहावा या हेतूने यशवंत सामाजिक प्रतिष्ठान सोनईच्या वतीने
माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी संत तुकाराम महाराज मंदिर ते ज्ञानेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवली जाते.

मंगळ दि 22 जुलै 2025 रोजी यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व सोनई महाविद्यालय व श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यात मंदिर परिसर व रस्त्यावर सकाळी 8 ते 11 या वेळेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली
प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व महाविद्यालयाचे विद्यार्थी करत असलेल्या स्वच्छता मोहिमेत ज्ञानेश्वर देवस्थानचे महंत देविदास महाराज म्हस्के स्वतः झाडू घेऊन सहभागी झाले व त्यांनीही स्वच्छता केली. याप्रसंगी बोलतांना वेदांतचार्य ह भ प देविदास महाराज म्हस्के म्हणाले की आषाढी वारीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक आवर्जून कमिका एकादशीला ज्ञानेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात व आपली वारी पूर्ण करतात अगदी त्याच प्रमाणे आषाढी वारीनंतर दुसऱ्या दिवशीही
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने पंढरपूर ला स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला व कामिका एकादशी निमित्त
दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वर मंदिरात स्वच्छता करत प्रतिष्ठान व सोनई तसेच श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाने
स्वच्छतेची वारी पूर्ण केली.

गावा,गावातील मंदिर व परिसरात हा उपक्रम व्यापक स्वरूपात राबवला जावा. साधू,संताना अभिप्रेत असलेले काम प्रतिष्ठान व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडुन होत असल्याचे ते म्हणाले व स्वच्छता वारी उपक्रम राबविल्याबद्दल आभार मानले.
याप्रसंगी अभय गुगळे, आशिष कावरे,सुनील साळुंके,रामकीसन कांगुणे,डॉ ईश्वर उगले,रणजित सोनवणे, दिनेश व्यवहारे,योगेश रासने,जालु गवळी,प्राचार्य डॉ अरुण घनवट,उपप्राचार्या राधा मोटे,डॉ बाळासाहेब खेडकर,प्रा डॉ जगदीश सोनवणे आदीसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा अमोल जाधव यांनी विद्यार्थ्यांसह पसायदान गायन करून उपक्रमाची सांगता करण्यात आली.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.