नेवासे – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नेवासे तालुक्यातील पाचेगांव, अमळनेर,करजगांव, निभांरी अश्या विविध गांवात वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेवासे तालुका अध्यक्ष अशोकराव मोरे यांनी उपस्थितांना ‘झाडे लावा आणि पृथ्वी हिरवीगार करा’ असे आवाहन केले. झाडे ही पृथ्वीवरील जीवनाचा आधार असून, वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी निसर्गाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून करण्यात आली. या प्रसंगी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेवासे तालुका अध्यक्ष अशोक मोरे, उपाध्यक्ष संभाजी जाधव, ओबीसी सेलचे विठ्ठलराव फुल सौंदर, गणेश गवळी, तालुका कार्याध्यक्ष अभय तूवर, राष्ट्रवादीचे युवा नेते वसंतराव कांगुणे, विक्रम तूवर, भास्कर तुवर, किशोर मोरे, शरद चव्हाण, अण्णासाहेब बाचकर , अण्णासाहेब माकोने, रामभाऊ पवार, दिनकर टेमक, नवनाथ गवळी,बजरंग रासकर, भाऊसाहेब बर्डे, मधुकर बर्डे, रमेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पाचेगाव येथील पसायदान सामाजिक संस्थेचे विशेष सहकार्य लाभले.
एक झाड़ एक पदाधिकारी सांगोपन आम्ही विविध गांवात हि झाड़े लावली यावेळी झाड़ाना सरक्षंण जाळी व फलक बसून एक झाड़ एक पदाधिकारी सांगोपन जबाबदारी देखील दिली. अशोकराव मोरे, अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेवासे तालुका
आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा : ७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.
कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.