नेवासा – महापारेषण कंपनीने ७ दिवसात २४ लाख २० हजार ७६५ रुपये न्यायालयात जमा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीने मालमत्ता कर वसुलीसाठी २२० केव्ही उपकेंद्राला लावलेले सील काढले.
सुनावणीत न्यायालयाने २४ लाख २० हजार ७६५ रुपये न्यायालयाकडे जमा करण्याचे आदेशित केले. त्यानुसार महापारेषण कंपनीचे अतिउच्चदाब संवर्धन व सुधारणा विभागाचे (बाभळेश्वर) कार्यकारी अभियंता उज्ज्वल पाटील यांनी सन २०२५-२६ या वर्षाची.. कर मालमत्ता रक्कम २४ लाख २० हजार ७६५ रुपये मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात ७दिवसात जमा करण्याची कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र ग्रामपंचायतीला दिल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी प्रतिभा पिसोटे यांनी दिली.
अभियंता शांतनु सूर्यकर यांनी सदर पत्र सरपंच शरद आरगडे यांचेकडे सुपुर्द केले. माजी उपसरपंच गणेश आरगडे, ग्रामपंचायत कर्मचारी किशोर आरगडे आदी यावेळी उपस्थित होते.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.