सोनई – करजगाव प्रादेशिक पाणी योजनेच्या खेडले परमानंद ते करजगाव दरम्यान मुख्य पाईपलाईन मध्ये अज्ञात ठिकाणावरून खाऱ्या पाण्याचा शिरकाव कायमस्वरूपी उच्च दाबाने होत आहे मात्र मुख्य पाईपलाईन सुरू असल्यामुळे संबंधित बाब नागरिकांच्या लक्षात येत नव्हती .गेल्या दहा दिवसापासून पाईपलाईन बंद असूनही पाणी प्रचंड वेगाने वाल मधून विसर्जित होत आहे .हे खरं पाणी येत कुठून हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे .
यापूर्वीही अनेक वेळेस याबाबतची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आलेली होती परंतु त्याकडे कानाडोळा करण्यात आलेला आहे .
म्हणजेच यावरून एक गोष्ट सिद्ध होती की जाणीवपूर्वक मुख्य पाईपलाईनचा वापर करून सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा मोठा कट आहे .

संबंधित योजनेचे अध्यक्ष सचिव यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दोषीवर कारवाई करावी अशी पाणी योजनेच्या लाभार्थ्यांची मागणी आहे .
हा जीव घेणा खेळ जो कोणी करीत आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा व्यापक स्वरूपाचे जन आंदोलन करण्याचा इशारा लाभार्थी नागरिकांनी दिला आहे .
यासंबंधीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हाधिकारी,तहसीलदार नेवासा,गटविकास अधिकारी,विस्तार अधिकारी आरोग्य विभाग यांना देण्यात आलेले असून प्रशासकीय स्तरावर काय कारवाई केली जाते याकडे आता सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे .


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.