नेवासा फाटा – नेवासा फाटा परिसरातील अहिल्या नगर व गाढे नगर या कॉलनीतील नागरिक सध्या चोरीच्या घटनांमुळे प्रचंड त्रस्त झाले आहेत. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या भागात घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असून, परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवाशांच्या माहितीनुसार, एक आठ ते दहा जणांची टोळी नियमितपणे घरफोड्या करत आहे. या टोळीतील चोरांकडे तलवारीसारखी धारदार हत्यारे असून, ते सशस्त्र अवस्थेत फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोकादायक झाले आहे.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, त्यांनी एक निवेदनाद्वारे पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी मागणी केली आहे की, परिसरात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवावी, संशयितांवर लक्ष ठेवण्यात यावे आणि चोरट्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी.
“चोरीच्या घटनांमुळे आमचे आर्थिक आणि मानसिक नुकसान होत आहे. आम्हाला संरक्षण मिळावे हीच आमची मागणी आहे,”असे रहिवाशांनी स्पष्ट केले.
पोलिस प्रशासनाकडून यावर लवकरच कार्यवाही होईल अशी अपेक्षा असून, नागरिकांनी आपल्या परिसरात सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.