नेवासा – सालाबाद प्रमाणे 23 जुलै 2025 आयोजित करण्यात आलेल्या आखाड महिन्यातील श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला. या धार्मिक सोहळ्याला गावकरी, कार्यकर्ते, सोयरे, बांधव आणि मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात्रेची सुरुवात पारंपरिक सनई-चौघडा, ढोल-ताशांच्या निनादात करण्यात आली. यात्रेमध्ये लखण ससाणे पोतराज पार्टी (कात्रड, ता. राहुरी) यांनी उपस्थित राहून यात्रा शोभिवंत बनवली. यात्रेचे मानकरी म्हणून वैभव विजय चव्हाण, शुभम चव्हाण, डॉ. राहुल चव्हाण, सुशील चव्हाण, गणेश चव्हाण, विशाल चव्हाण, संदीप चव्हाण, मनिष चव्हाण, अतुल चव्हाण, संतोष चव्हाण, सनी चव्हाण, रामा चव्हाण, भाऊसाहेब चव्हाण, आकाश चव्हाण, किरण चव्हाण यांचा सन्मानपूर्वक सहभाग होता.
श्री लक्ष्मीआई मंदिरा मध्ये महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. यावेळी श्री. नंदकुमार पाटील, सुनील वाघसाहेब, मनोज पारखे, डॉ. करण घुले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

यात्रेच्या निमित्ताने आयोजित कावड यात्रा विशेष आकर्षण ठरली. संपूर्ण चव्हाण परिवार व मित्रमंडळींनी भक्तिभावाने महालक्ष्मी मंदिरात जलाभिषेक केला. कावड यात्रेत सहभागी सदस्यांमध्ये हर्षल चव्हाण, सार्थक चव्हाण, यश चव्हाण, शुभम चव्हाण, करण चव्हाण, अर्जुन चव्हाण, अभिषेक चव्हाण, मणेश चव्हाण, विश्वास चव्हाण, अनमोल चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण, तसेच मित्र परिवारातील निखिल आळपे, योगेश लष्करे, लखन खरे, रोहित कनगरे, दीपक शिरसाठ, ऋषिकेश टिकेकर, यश भोसले यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
संपूर्ण यात्रा सोहळा अत्यंत आनंददायी, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. स्थानिक ग्रामस्थ व आयोजकांनी परिश्रमपूर्वक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. नेवासा नगरीतील हा धार्मिक उत्सव पुढील काळातही अशीच एकतेची आणि श्रद्धेची शान उंचावणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.