शिरसगाव – येथे महिला बचत गटांची बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीस सौ. रत्नमाला विठ्ठलराव लंघे पाटील यांनी उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले.
यावेळी त्यांनी महिला स्वयंसहायता बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच गटांच्या माध्यमातून स्वरोजगार निर्मिती, उद्योजकता विकास आणि आर्थिक स्वावलंबन यावर भर देण्याचे आवाहन केले.

या बैठकीस महिला बचत गटांच्या प्रमुख सदस्यांसह गावातील अनेक महिलांची उपस्थिती होती. उपस्थित महिलांनी आपले प्रश्न व अडचणी मांडत सौ. रत्नमालाताईंशी थेट संवाद साधला.
अंतर्गत समन्वय, बचत योजना, कर्ज वितरण, आणि विक्री केंद्र उभारणी यासारख्या विषयांवर चर्चाही झाली. नेवासा पंचायत समिती येथे कार्यरत असलेले बचत गट समन्वयक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. बैठकीचे आयोजन प्रभावीरीत्या करण्यात आले असून महिला बचत गटांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.