ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
विठ्ठलराव लंघे

नेवासा- नेवासा नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना – घरकुल योजनेचे अनेक दिवसांपासून प्रलंबितअनुदान व थकीत अनुदान नेवासा तालुक्यातील लोकप्रिय आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करून घरकुल हप्ता चा धनादेश लाभार्थ्यांना आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

आमदार विठ्ठलराव लंघे यावेळी बोलताना म्हणाले की या उपक्रमामार्फत अनेक गरजूंना घराचे स्वप्न साकार होत असून, “सर्वांसाठी निवारा” या संकल्पनेला गती मिळत आहे. हे काम करत असताना गोरगरिबांचा आशीर्वाद मला मिळतो आहे व या कामाचा आनंदही मला पुढील काम करण्यासाठी प्रेरणा देत आहे तालुक्यामध्ये अशा प्रकारचे अनेक कामे मी पुढील काळामध्ये माझ्या आमदारकीच्या माध्यमातून मार्गे लावणार असून एकही लाभार्थी घरापासून वंचित राहणार नाही यासाठी मी नेहमी सरकारकडे पाठपुरावा करत राहणार असल्याची बोलताना सांगितले .

विठ्ठलराव लंघे

कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर नगरपंचायत मुख्याधिकारी, संतोष लांडगे, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख भाऊसाहेब वाघ, नेवासा भाजप युवा नेते ऋषिकेश भाऊ शेटे , भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, डॉ करण घुले, भाजप किसान मोर्चा जिल्हाध्यक्षअंकुश काळे, गणेश लंघे, कृषी परिषद सचिवआदिनाथ पटारे ,संजय लंघे विजयाताई अंबाडे, भाजप महिला आघाडी प्रदेश सचिव सौ अमृता ताईं नळकांडे, भाजप नगरसेविका .डॉ. निर्मलाताई सांगळे, रितेश कराळे, राजेश कडू आदी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.

विठ्ठलराव लंघे
विठ्ठलराव लंघे

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

विठ्ठलराव लंघे
विठ्ठलराव लंघे

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

विठ्ठलराव लंघे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *