नेवासा – नेवासा तालुक्यातील वाकडी येथील धान्य दुकानदार स्वस्त धान्य दुकानातील धान्य गोण्या बदलून काळ्या बाजारात विक्री करण्यास घेवून जात असताना ग्रामस्थांनी पकडले. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे २३ गोण्या प्रत्येकी ५० किलो तांदुळ आणि १३ गोण्या प्रत्येकी ५० किलो -गहू अशा एकूण ३६ गोण्या धान्य वाहनासह ग्रामस्थांनी पुरवठा निरिक्षक आणि नेवासा पोलिसांना रंगेहाथ पकडून दिल्या. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवार दि.२३ दुपारी तीन वाजेच्या सुमारास वाकडी येथील धान्य दुकानातून रेशनकार्डावर मोफत वाटप होणाऱ्या गहू-तांदळाच्या सरकारी गोण्या बदलून ते धान्य दुसऱ्या गोण्यांत भरुन सुझुकी कंपनीच्या सुपर कॅरे वाहन (क्र. एम.एच.१२ व्ही.टी. १७७८) या टेम्पोमध्ये भरत असताना येथील ग्रामस्थ विठ्ठल भिमराज काळे, विजय बाळू बनकर, विकास रावसाहेब काळे, उत्तम नामदेव कार्ले यांनी पाहिले, त्यांनी तातडीने या वाहनाधारकाला मज्जाव करत सदर घटनेची माहीती तहसिलदार डॉ. संजय बिरादार यांना भ्रमनध्वनीवरुन सांगितली.

तहसिलदारांनी त्वरीत नेवासा पुरवठा निरिक्षक सुदर्शन दुर्योधन, कामगार तलाठी
तसेच पोलिसांना घटनास्थळी पाठविले, रेशनचा माल काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी घेवून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनासह मुद्देमाल ताब्यात घेवून घटनेचा. पंचनामा करण्यात आला. ग्रामस्थांनी रेशनकार्डावर गोरगरीबांना मोफत वाटप होणाऱ्या धान्याची काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या धान्य दुकानाचा परवाना रद्द.. करण्याची मागणी यावेळी पुरवठा निरिक्षक दुर्योधन यांच्याकडे केली. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात गोवर्धन कुंडलिक काळे व बहिरनाथ अण्णा वाघमुळे (दोघेही राहणार दिघी, ता. नेवासा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.