अहिल्यानगर – “शेत तिथे रस्ता, गाव तिथे समृद्धी” या घोषवाक्यानुसार शेत रस्त्यांवरील तणाव मिटवण्यासाठी नेवासा
येथील महाराष्ट्र राज्य शेत व शिव पानंद रस्ता चळवळीचे उपाध्यक्ष शिंदे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शेत रस्ता मिळण्यासंदर्भात मागणी केली आहे. तसेच जिल्हा न्यायाधीश, तहसीलदार, प्रशासकीय अधिकारी व शेतकऱ्यांचा संयुक्त मेळावा घेण्यात यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.
कलम १४३ व ५(२) अंतर्गत वाद, अंमलबजावणीतील अडथळे, अतिक्रमण, अपील प्रक्रिया यावर चर्चा व्हावी यासाठी मेळाव्याचे आयोजन करणे गरजेचे असल्याचं नाथाभाऊ शिंदे यांचा आग्रह आहे…

जिल्हा न्यायाधीश अंजू एस शेंडे यांची अनौपचारिक सहमती असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर त्या मेळाव्याला हजर राहण्यास तयार आहेत. “समन्वयातून शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील,” असा विश्वासही नाथाभाऊ शिंदे पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शरद भाऊसाहेब पवळे, नाथाभाऊ शिंदे पाटील, बाळासाहेब तुकाराम थोरात, बाबासाहेब लक्ष्मण, सोमनाथ माकोणे, लक्ष्मण जाधव, प्राचार्य डॉक्टर लक्ष्मण मतकर, अर्जुन भाऊ आठरे, कारभारी एकनाथ गरड, राजेंद्र गरड ,भास्कर राव चेमटे, पोपटराव शेळके, विजयराव हापसे, मतीन खान पठाण, आबासाहेब सोनवणे, प्रशांत चौधरी, महेश पठारे, रामदास पवार, सचिन काळे, संतोष शिंदे, चांगदेव शिंदे यांचे सह आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.