गणेशवाडी — नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील आता एक नवीनच वाद उफाळून आला आहे. देवस्थान चे जुने कर्मचारी असलेले यांना दि. १ ऑगस्ट २०२४ रोजी सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. तो पुर्णतः चुकीच्या पद्धतीने लागू केलेला आहे. त्यात अनेक वेतनश्रेणी व महागाई तसेच इतर भत्ते नियमानुसार देण्यात आलेले नाहीत. आपण दिलेल्या लेखी पत्रकानुसार यातील त्रुटींची पुर्तता १ जानेवारी पर्यंत करणे आवश्यक होते. परंतु आपणाकडे वेळोवेळी आपणाकडे लेखी व तोंडी पाठपुरावा करून देखील आज अखेर पर्यंत कुठलीही पुर्तता झालेली नाही. माननीय कामगार आयुक्त अहिल्यानगर यांचे समोर आठ बैठक होऊनही आपण कुठलाही ठोस निर्णय घेतला नसून फक्त वेळकाढूपणा केला आहे.

या कारणास्तव सोमवार दि. ४ ऑगस्ट पासुन कर्मचारी त्यांच्या १) सहाव्या वेतन आयोगा प्रमाणे नियमानुसार सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना देय वेतन श्रेणी व इतर भत्ते मिळावे. २) महागाई भत्ता २४६℅देण्यात यावा. ३) बारा वर्षे सेवा झाल्यानंतर कालभध्द पदोन्नती मिळावी . ४) सेवा जेष्ठतेनुसार पदोन्नती किंवा समकक्ष वेतन श्रेणी देण्यात यावी. ५) कोरोना काळातील १८ महिन्याचे थकीत वेतन अदा करण्यात यावे. ६) नियमानुसार दर सहा महिन्याला नियमानुसार भत्ता वाढ करण्यात यावी. ७) सहावा वेतन आयोगाचे पगार पत्रक अधिकृत शासन मान्य तज्ञ लेखाधिकारी यांच्या कडून पडताळणी करुन घेण्यात यावे. ८) १ ऑगस्ट २०२४ पासुन च्या फरकासह सुधारीत वेतन सर्व कर्मचाऱ्यांना मिळावेत.

या मागण्यांसाठी ४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता श्री शनैश्वर देवस्थान कामगार युनियन अध्यक्ष शामसुंदर रामदास शिंदे सचिव अजित सोपान शेटे, संचालक सुखदेव एकनाथ मनाळ, सुदाम पोपट भुसारी, संदीप आप्पासाहेब दरंदले, हे येथील महाद्वार छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषणाला बसणार आहेत. तसेच त्यांना पाठिंबा म्हणून उर्वरित ३५८ जुने कायम कर्मचारी हे साखळी पद्धतीने उपोषण करणार आहेत. या उपोषणाद्वारे होणाऱ्या नुकसानीस देवस्थान प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे. माहिती स्तव पालकमंत्री अहिल्यानगर, नेवासा विधानसभा आमदार, जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सहाय्यक धर्मदाय आयुक्त अहिल्यानगर, सहाय्यक कामगार आयुक्त, तहसीलदार नेवासा, शनिशिंगणापूर पोलीस ठाणे, सरपंच ग्रामपंचायत शनिशिंगणापूर यांना सदर निवेदन देण्यात आले असल्याचे कळविण्यात आले आहे.

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.