ताज्या बातम्या

195871+

आम्ही नेवासकर न्युजची एकूण वाचक संख्या

  • arban
संत ज्ञानेश्वर

नेवासा : येथील संत ज्ञानेश्वर मंदिराच्या आवारात एकादशीच्या दिवशी दर्शनावरून विश्वस्त व उद्योजकांमध्ये झालेल्या वादंगप्रकरणी दोन्ही बाजूंनी चर्चा करण्यात आली आहे. या प्रकारावर पडदा पडण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोशल मीडियावर कोणीही अफवा पसरू नये. तसेच देवस्थानमधून या प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेज बाहेर गेल्याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.

कामिका एकादशी दिवशी दुपारी मंदिर प्रांगणात संस्थानचे एक विश्वस्त व उद्योगपती यांच्यात दर्शनावरून वादंग झाले. या वेळी काही मंडळी यांनी सावरासावर करण्याचे प्रयत्नही केले व विषयावर पडदा पडला. मात्र, याच घटनेचे लोण दोन दिवसांत तालुक्यातील सोशल मीडियावर पसरले आणि पुन्हा वादाचा विषय ऐरणीवर आला. यात काही वारकरी, सामाजिक कार्यकर्ते व राजकीय मंडळीही उतरली.

संत ज्ञानेश्वर

फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअॅप अशा ठिकाणी टीका टिप्पणी सुरू झाल्याने स्थानिक पत्रकारांनी देवस्थानचे अध्यक्ष पांडुरंग अभंग यांची भेट घेऊन चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, कामिका एकादशीनिमित्त पैस खांबाच्या दर्शनावरून वादंग झाले होते. असा प्रकार धार्मिक ठिकाणी नाही झाला पाहिजे. मंदिरात घडलेला प्रकार चुकीचा आहे. मंदिर सर्वांच्या आस्थेचा विषय आहे. विश्वस्त व उद्योजक यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी दोघांनी समजूतदारपणा दाखवला आहे. पुन्हाही आपण चर्चा करणार आहोत. वादंगावर पडदा पडल्यानंतर पुन्हा देवस्थानमधील सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओच्या व्हायरल चर्चा सुरू झाल्याने याबाबत आपण चौकशी करणार असून, त्यानंतरच दोषींवर कारवाईचा निर्णय घेतला जाणार असल्याचे अभंग यांनी पत्रकारांना सांगितले.

या वेळी विश्वस्त रामभाऊ जगताप, कृष्णा पिसोटे. माऊली शिंदे आदी उपस्थित होते.

संत ज्ञानेश्वर
newasa news online

आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.

आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.

संत ज्ञानेश्वर
संत ज्ञानेश्वर

कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.

संत ज्ञानेश्वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *