भेंडा – नेवासा तालुक्यातील सौंदळा येथे शनिवार दि.२६ जुलै रोजी पहाटे ३.३० च्या दरम्यान आरगडे यांच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. त्यात ३ शेळ्या जागीच मृत झाल्या व ३ शेळ्या जखमी केल्या आहेत.
सौंदाळा येथील शेतकरी सुदाम निवृत्त्ती आरगडे यांचे गोठ्यात बांधलेले ६ शेळ्यांपैकी एक एक करून ६ शेळ्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात ३ जागीच मरण पावल्या. राहिलेल्या ३ पैकी २ गंभीर जखमी आहे.तर एक सुधारली आहे.

बिबट्या रात्री शेळ्यावर हल्ला करत असताना कुत्रे भुंकल्यामुळे घरातील सदस्य जागे झाले व ते बाहेर बॅटरी घेऊन आले .नंतर बिबट्याने लगेच तिथून काढता पाय घेतला . शिकार अधुरीच राहिल्याने त्याचा परत येण्याचा विचार होता,असे देविदास आरगडे यांनी सांगितले कारण त्यांनी आसपास बघितले असता उसाचे शेताजवळ तो दबा धरून बसलेला दिसला मात्र तिथून त्यांनी त्यास हुसकावून लावले.
वनविभागाचे कर्मचारी व पशुधन विकास अधिकारी यांनी दि. २६ रोजी घटनास्थळी भेट देवून मृत शेळ्यांचा पंचनामा केला आहे .
वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.


आपली जाहिरात इथे करण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा :
७५०७६७६०७५.
आम्ही नेवासकर न्युज अपडेट साठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि नेवासा तालुक्यातील सर्व न्यूज अपडेट जाणून घ्या.


कृपया एका व्यक्तीने एकच ग्रुप जॉईन करावा, कारण सर्व ग्रुप वर सारख्याच न्युज अपडेट होणार आहे.